महत्वाच्या घडामोडी

सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव संपन्न, ‘या’ महाविद्यालयांनी मिळवले विजेतेपद…

पुन्हा  एकदा सर्वसाधारण विजेतेपदाचा बार्शीचा रुबाब तर संगमेश्वर द्वितीय व अकलूजची क्रमांक मिळवत  दादागिरी* बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद!

संगमेश्वर कॉलेजला दुसरे तर अकलूजला तिसरे बक्षीस!

मंगळवेढा- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक 91 गुणांसह बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद 50 गुणांसह संगमेश्वर कॉलेज तर 49 गुण घेऊन अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाने तिसरे पारितोषिक मिळविले.

मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवारी पारितोषिक वितरण झाले. सिने अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. कुलसचिवा योगिनी घारे, संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी महाडिक, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, डॉ गुणवंत सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

ललित, वांग्मय, नाट्य या तिन्ही विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. नृत्य विभागाचे पारितोषिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास मिळाला. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद कॉलेजला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी मानले.

चौकट:

सांगोल्याची तृप्ती गोल्डन गर्ल तर

बार्शीचा सुरज गोल्डन बॉय..

युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचा किताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी सांगोला कॉलेज सांगल्याची तृप्ती बेंगलोर कर तर गोल्डन बॉयचा किताब बार्शीच्या शिवाजी कॉलेजचा सुरज काळे यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *