महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! सोलापुरात गणपती लागले रडायला…

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापुरात होटगी – कुंभारी रस्त्यावरच्या गणपती मंदिरात अचानक भाविकांची गर्दी वाढताना दिसू लागली. एवढी गर्दी का वाढते आहे याचा तपास केला असता, या मंदिरातील गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे समजले. त्यामुळे भाविक ते पाहण्यासाठी मंदिरात गर्दी करत होते.

काहीजणांनी एवढी गर्दी झाल्यामुळे ही गोष्ट अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कानावर घातली. त्यानंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अये अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

कुंभारी रोडवर बेनक गणपती मंदिर आहे. या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे तेथील भाविकांनी हार, नारळ घेऊन दर्शनासाठी गर्दी केली. ही अफवा असून त्यामागचे वैज्ञानिक कारण काय आहे, त्याचा शोध घेऊन सत्य निदर्शनास आणले जाईल.. असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *