महत्वाच्या घडामोडी

सोलापूरचे जिल्हाआरोग्य अधिकारी तडकाफडकी निलंबित

एबी मराठी न्यूज नेटवर्क

नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे.. या तातडीच्या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे..

सोलापूर जिल्ह्यात २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबद्दल सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तानाजी सावंत बोलत होते..

डॉ सावंत यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रांचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे.. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे, मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही..

नवीन प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणाही डॉ.सावंत यांनी यावेळी केली..

राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, गरजा वाढत आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांसाठी पदभरती,मशिनरी,अर्थवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल.. शिवाय या मोहिमांच्या कामासाठी सर्वकष कृती आराखाडा तयार करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *