महत्वाच्या घडामोडी

बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेला, अन स्लिपवर लिहिलं असं काही.. पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

प्रतिनिधी / व्हायरल

आपण पाहतो की सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.. सध्या सोशल मिडीयावर एका बँकेची डिपाँझिट स्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.. ही स्लिप एका ग्राहकाने पैसे जमा करण्यासाठी भरली आहे.. आणि त्यातला मजकूर चांगलाच व्हायरल होत आहे..

ही व्हायरल होत असलेली स्लिप इंडियन बँक मुरादाबाद येथील शाखेची आहे.. या बँकेत एक ग्राहक त्याच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आला होता.. त्यावेळी बँकेतील अधिकाऱ्याने त्याला स्लिप भरण्यासाठी दिली..

या ग्राहकाने स्लिपमधील सर्व माहिती अचूकपणे भरली आणि रक्कम हे हिंदीत राशी असे लिहिले होते, त्या रकमेच्या रकान्यात त्याने आपली रास ‘ तूळ ‘ असे लिहिले आहे.. या स्लिपवर बँकेचा शिक्का व तारीखही आहे.. म्हणजेच ही चूक होऊनही बँकेच्या अधिकाऱ्यांनी या खातेदाराचे पैसे जमा केल्याचे स्पष्ट दिसत आहे..

या व्हायरल व्हिडीओतील स्लिप पाहून अनेक लोकांना आपले हसू आवरता येत नाहीत.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *