महत्वाच्या घडामोडी

वाखरीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर्स फोडले 

एबी मराठी न्यूज नेटवर्क

 ऊस दर संघर्ष समितीने आवाहन केल्यानंतरही ऊस वाहतूक सुरू राहिल्याने बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील थोरात पेट्रोल पंप येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे सर्व टायर्स अज्ञात लोकांनी फोडले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात ऊस दर आंदोलन पेटल्याचे दिसते

पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास दादा गुंडीबा पाटील यांचा ( एम एच 19, 2809 ) हा ट्रॅक्टर चळे ता.पंढरपूर  येथुन ऊस घेऊन निघाला होता. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर वाखरी हद्दीतील बाजीराव विहीर परिसरातील थोरात पेट्रोल पंप येथे आला असता. अज्ञात 3 जणांनी येऊन चाकु दाखवून ट्रॅक्टर अडवला आणि ट्रॅक्टरच्या दोन्ही टायर्सचे सर्व 8 आणि ट्रॅक्टर चे दोन्ही मोठे टायर्स फोडले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत ट्रक्टर चे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *