महत्वाच्या घडामोडी

कौतुकास्पद ! शेतकऱ्याचा मुलगा विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात अव्वल..

प्रतिनिधी / औरंगाबाद

जुलै मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेची अंतिम निवड, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.. या परीक्षेत लाडसावंगी येथील अक्षय दिवाणराव पडूळ या शेतकऱ्याच्या मुलाने राज्यात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे..

अक्षय ने बीएस्सीच्या शेवटच्या वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती.. अक्षय म्हणाला की, निराश न होता सातत्याने मी अभ्यास करत राहिलो.. आई – वडील प्रेरणा देत असल्याने मला हे यश मिळाले आहे..

अक्षय पुढे म्हणतो की, राज्यसेवेची पूर्व परीक्षा मी दिली आहे.. मुख्य परीक्षा जानेवारीत होणार आहे.. त्याची तयारी सुरु आहे.. गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानाने मी भारावलो असून पुढचा टप्पा गाठायचा हुरूप मला त्यामुळे मिळाला आहे.. असेही अक्षय ने म्हटले आहे..

लाडसावंगी गावातील शिक्षक, विध्यार्थ्यांसह राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून गावकऱ्यांनी अक्षय चा सन्मान केला आहे.. परिसरातही त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *