महत्वाच्या घडामोडी

कौतुकास्पद ! शेतकऱ्याचा मुलगा झाला मोठा अधिकारी…

प्रतिनिधी / बिहार

माणसाच्या मनात जर एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल तर तो नक्कीच यश मिळवू शकतो.. बिहारमधून अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.. बिहारच्या मुझप्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अंशूमौली आर्यने एनडीए परीक्षेत ९२ वा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे..

अंशूमौलीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला त्याचा अभिमान वाटत आहे.. तसेच त्याच्या कुटुंबालाही खूप आनंद झाला आहे.. अंशूमौलीने त्याच्या या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आई – वडिलांना दिले आहे..

अंशूमौलीची आई नविता कुमारी या ग्रंथपाल आहेत तर त्याचे वडील अमिताभ अगस्त्य हे शेतकरी आहेत.. अंशूमौली ११ वीत असताना त्याला एनडीएच्या परीक्षेची माहिती मिळाली होती.. त्यावेळी त्याने तयारी सुरु केली..

अंशूमौली म्हणतो की, एनडीएच्या माध्यमातून देशातील प्रोफेशनल संस्थेत सामील होण्याची संधी मला मिळाली आहे.. मी अधिकारी म्हणून एनडीएत सामील होण्यासोबतच अनेक जबाबदाऱ्याही पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर असेल..

अंशूमौलीने एनडीएमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांना सांगितले आहे की एनडीए परीक्षेची तयारी करण्याबरोबरच एक चांगला माणूस बनणे खूप महत्वाचे आहे.. शिस्तीचे पालन करणे ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे.. यातूनच व्यक्तीचा विकास होत असतो असेही त्याने म्हणले आहे.. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *