महत्वाच्या घडामोडी

पुराच्या पाण्यातून शेतमाल बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याचं देशी जुगाड , व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल…

भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते.. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्याशिवाय पर्याय नसतो.. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ यासारखे जीवनावश्यक बाबींचा निर्माता हा शेतकरी आहे.. समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशा अडचणींचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय..

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.. ज्यामध्ये आपण पाहू शकता की शेतकऱ्याच्या शेतात पुराचे पाणी आले असतानाही तो आपल्या शेतातील टोमॅटो बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी जीव धोक्यात घालून बाहेर काढताना दिसत आहे.. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलं नाही.. पण हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *