स्पेशल स्टोरीज

कष्टकरी शेतकरी आई-बापाचा मुलगा होणार डॉक्टर…

प्रतिनिधी / सांगोला

काही दिवसांपूर्वी १२ वी नंतर वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला.. यामध्ये शिरभावी तालुका सांगोला येथील दादासाहेब महादेव बनसोडे या मुलाने घवघवीत यश मिळवलं आहे.. त्याला या परीक्षेत ५४७ मार्क्स पडले असून, MBBS प्रवेशासाठी पात्र झालेला तो गावातील पाहिला तरुण ठरला आहे.. दादासाहेब याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, माध्यमिक शिक्षणही त्याने मराठी माध्यमातून पूर्ण केले.. अकरावी बारावीत पंढरपूरच्या सरस्वती सायन्स अकॅडमी येथे प्रा. गजानन गायकवाड व प्रा. के. एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नीट परीक्षेची तयारी केली..

दादासाहेब याने ग्रामीण भागात राहून, शेतशिवारात कामे करून मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.. दादासाहेब याचे आई वडील अशिक्षित आहेत.. मात्र त्यांनी पोराला शिकवण्यात कोणतीही कसर राहू दिली नाही.. एक एकर जमीन असूनही त्यांनी पोराला मोठ्या जिद्दीनं शिकवलं.. आता आपलं पोरगं डॉक्टर होणार असल्यानं त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.. मनात जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण कोणतंही यश सहज मिळवू शकतो, हे दादासाहेब याने दाखवून दिलंय.. कोणत्याही कामात सातत्य ठेवलं तर यशाचं शिखर आपण गाठू शकतो, यावर त्याचा विश्वास आहे.. दादासाहेब याला आता MBBS साठी प्रवेश मिळणार आहे.. तिथंही तो मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करेल यात शंका नाही.. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..

एबी मराठी न्यूज, सांगोला

One thought on “कष्टकरी शेतकरी आई-बापाचा मुलगा होणार डॉक्टर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *