शेतकरी

शेतकऱ्याने जुगाडातून बनवला नंदी ब्लोअर

काळ्या मातीची कूस उजवून त्यात पिकांचं भरघोस उत्पादन घेण्याची किमया फक्त शेतकर्यांनाचं उपजत असते.. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक  अडचणींवर शेतकरी मात करत असतो..

खुनेश्वर तालुका मोहोळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर हरिदास चव्हाण या शेतकर्याने स्वतःच्या कल्पनाशक्तीने जुगाड करून अवघ्या ४० हजारात नंदी ब्लोअर तयार केला आहे..

सामान्यतः बागांच्या फवारणीसाठी ट्रॅक्टरचा  वापर केला जातो.. मात्र हा खर्च तब्बल पाच ते सहा लाखांवर जाण्याची शक्यता असते.. नंदी ब्लोअर मुळे हेच काम अवघ्या ४० हजारात होत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा ब्लोअर जणू एक वरदानच ठरलां आहे.. 
दोन वर्षांपूर्वी चव्हाण यांनी दोन एकर द्राक्ष लागवड केली होती.. मात्र बागेत ट्रॅक्टर  आणि  मजुरांमार्फत फवारणीसाठी मोठा खर्च होत होता.. तसेच वेळही लागायचा.. त्यामुळे मोटारसायकलच्या जुन्या चाकांचा व लोखंडी angalcha वापर करीत केवळ पाच हजारात त्यांनी गाडा तयार केला.. त्यावर पाठीमागील बाजूस एसटीपी पंप बसवला, त्यापुढे पाच एचपीचे डीझेल इंजिन व त्यापुढे दोनशे लिटर क्षमतेचा आडवा baylar बसवला.. वीस एमएस ड्रीपच्या नळ्यांचा वापर केला.. फवारणीसाठी दोन्ही बाजूला चार- चार स्प्रे-गण बसवले.. गाडा ओढण्यासाठी एक बैल जुंपण्याची व्यवस्था केली..
या नंदी ब्लोअर मुळे मजुरीच्या खर्चातून सुटका होते व वेळेची बचत होते.. पडत्या पावसातही फवारणीचे काम सहज होते.. द्राक्षे बागेत औषध फवारणी एकसमान होते .. ट्रॅक्टर ने फवारणीसाठी एक एकरासाठी एक लिटर डिझेल लागते तर नंदी ब्लोअरमध्ये एका लिटर मध्ये सहा एकराची फवारणी होते.. 

त्यामुळे या शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाचे सर्वत्र कौतुक होत आहे..यासंबंधी शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी एबी मराठीशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *