महत्वाच्या घडामोडी

बापरे ! सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी…

प्रतिनिधी / दुबई

सोशल मिडीयावर सध्या बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाझ गिलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. एका कार्यक्रमानिमित्त शहनाझ गिल सध्या दुबईत आहे.. दुबईत पार पडलेल्या ‘ मिडल ईस्ट अचिवर्स नाईट २०२२ ‘ या कार्यक्रमाला तिने हजेरी लावली होती..

दुबईतील फोटो आणि व्हिडीओ शहनाझ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.. अशाच एका सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शहनाझ एका सिंहाच्या पिल्लाला रुममध्ये पाहून घाबरताना दिसत आहे..

शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक सिंहाच पिल्लू एका रुममध्ये आरामात इकडेतिकडे फिरताना दिसत आहे.. त्याच्या आजूबाजूला बरीच लोक दिसत आहेत.. मात्र त्या पिल्लाला असं मोकळं फिरताना पाहून शहनाझ प्रचंड घाबरली आहे..

अशावेळी एक व्यक्ती शहनाझला रुममध्ये बोलवते.. शहनाझही धाडस करून रुममध्ये जायला तयार होते.. परंतु जेव्हा ते सिंहाच पिल्लू शानाझच्या जवळ येऊ लागते, तेव्हा ती “वाहेगुरू,वाहेगुरू ” ओरडतच रुमच्या बाहेर पळून जाते..

शहनाझच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *