महत्वाच्या घडामोडी

शंकरराव मोहिते महाविद्यालय नव उद्योजक निर्मितीचे केंद्र बनेल: डॉ. सचीन लढ्ढा…

प्रतिनिधी / अकलूज

दिनांक २१ नोव्हेंबर 2022 रोजी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज व इंक्युबेशन सेंटर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने “सोलापूर स्टार्टअप यात्रा: ध्यास नाविन्याचा शोध नव उद्योजकांचा” या अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रेरणेने निमंत्रक संस्थेमार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

याप्रसंगी बोलताना डॉ लढ्ढा म्हणाले की महाविद्यालय आणि संस्था नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे या अनुषंगाने तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नवउद्योजक यांना सामावून घेऊन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्था तत्पर राहील. यावेळी बोलताना तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री जितेंद्र बाजारे यांनी विद्यार्थी आणि नवउद्योजकांना त्यांना आलेल्या अनुभवांची गाथा कथन केली तसेच उद्योजकांच्या माहितीसाठी त्यांनी आपला जीवन प्रवास सांगितला आणि यामध्ये व्यवसाय कौशल्याचा कस उद्योगांमध्ये कसा लागतो याची देखील माहिती दिली. यावेळी अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ दत्तात्रय बागडे होते. 

सोलापूर विद्यापीठाचे इनोवेशन, इंक्युबेशन अँड लिंकेजेसचे डायरेक्टर डॉ.सचिन लड्डा पुढे बोलताना म्हणाले की तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील नव युवकांना आणि युवतींना व्यवसायासाठी आणि नवउद्योगासाठी  लागणारे प्रशिक्षण आणि भांडवल विद्यापीठातर्फे पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विद्यापीठाच्या उद्यम इंक्युबेशन सेंटरचे मॅनेजर श्री. श्रीनिवास पाटील आणि श्री. श्रीनिवास नलगेशी तसेच बसवराज सुतार उपस्थित होते.

   हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ विश्वनाथ आवड, डॉ आण्णासाहेब नलावडे, डॉ चंद्रशेखर ताटे देशमुख, प्रा विनायक माने, प्रा शिवाजी राजगुरु, प्रा नितीन साळुंखे, डॉ विशाल सांळुंखे, प्रा जयंत माने, श्री युवराज मालुसरे, नेहा माने, प्रकाश सुरवसे, भावना घोंगाणे, सायली मुंडफणे, वैष्णवी खिलारे, रुतुजा पवार, भाग्यश्री सातपुते, स्वप्नील खंडागळे, समाधान इंगळे, कृष्णा जगताप, सुरज ननवरे, मारूती सुर्वे, समाधान वाघमोडे यांनी प्रयत्न केले. 

    या कार्यशाळेत प्रा विष्णु सुर्वे, डॉ सज्जन पवार, डॉ आप्पासाहेब बाबर, प्रा बाबूराव पाटील, प्रा प्रसाद लोहार, डॉ रामभाऊ सावळजकर, डॉ सविता सातपुते, डॉ सुधा बनसोडे यांचेसह माळशिरस तालुका परीसरातील विविध कनिष्ठ व वरिष्ठ  महाविद्यालयातील 175 पेक्षा जास्त विदयार्थी सहभागी झाले होते.. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु भावना घोंगाणे व कु नेहा माने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *