महत्वाच्या घडामोडी

शाळेतील मुलांना घेऊन जात असताना स्कूल व्हॅनचे चाक निखळले.. १० शाळकरी मुलांचा जीव वाचला…

प्रतिनिधी / नागपूर

नागपूर येथे वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर एक धक्कादायक घटना घडली आहे… येथे एका चालत्या स्कूल व्हॅनचे चाक निघाल्याने ही व्हॅन एका क्षणात एका बाजूने कलंडली आणि काही अंतर अक्षरशः घासत गेली.. या व्हॅनचा वेग नियंत्रणात आल्याने तिला थांबवण्यात यश आले आहे..

नागपूरमधील एका नामांकित शाळेतील १० विद्यार्थी सकाळी स्कूल व्हॅनमध्ये चालली होती.. छत्रपती नगर मेट्रो स्थानकाजवळ आल्यानंतर अचानक व्हॅन हेलकावे खाऊ लागली.. हे मागे बसलेल्या वाहन चालकाच्या लक्ष्यात आले..

नंतर काही क्षणातच व्हॅनचे डाव्या बाजूचे मागील चाक निघाले होते आणि व्हॅन एका बाजूला कलंडली आणि तशीच घासत समोर गेली.. सुदैवाने या व्हॅनमधील कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही.. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनाही याची खबर देण्यात आली आहे..

उड्डाणपुलावर सकाळची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि स्कूल व्हॅनचाही वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *