महत्वाच्या घडामोडी

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीनीचा संघर्षमय प्रवास.. पाहा हा धक्कादायक व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

आपण पाहतो की आजच्या तरुण पिढीला साहसी खेळ खेळायला खूप आवडतात.. आजची तरुण पिढी धोकादायक आणि भीतीदायक स्टंट करताना आपण पाहत असतो.. पूर्वीच्या काळी रस्ते नसल्यामुळे अनेकांना रोज एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागत होता..

आपण पाहतो की, आदिवासी गावामध्ये आजही जगण्यासाठी लोकांना जीव धोक्यात घालावा लागतो.. असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतीये..

सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ही शाळकरी मुलगी नदी ओलांडताना दिसत आहे.. नदी ओलांडण्यासाठी ती नदीवरील दोरीवर जाळी टाकते आणि या जाळीला धरून ही मुलगी वेगाने लटकत नदी ओलांडते..

व्हायरल होणारा हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.. सुरक्षिततेची कोणतीही सोय किंवा उपाय नसल्यामुळे ही शाळकरी मुलगी अशा धोकादायक मार्गाने प्रवास करताना दिसत आहे.. या विद्यार्थीनींना शिक्षणासाठी रोज असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *