महत्वाच्या घडामोडी

एका सायकलवर ९ मुलांना शाळेत सोडणाऱ्या या वडिलांचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल…

प्रतिनिधी / व्हायरल

आजकाल सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येणार नाही.. आजकाल वाढत्या लोकसंख्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना आपल्याला दररोज सामोरे जावे लागते.. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्या मुलांना सायकलवरून शाळेत सोडणारे वडील दिसत आहेत.. आता सायकल म्हणल्यावर तुम्हाला असे वाटेल की एक किंवा फारतर दोन मुले असतील.. पण चक्क ९ मुलांना हे वडील सायकलवर शाळेत सोडायला जात असताना दिसत आहेत..

या व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती सायकल चालवत असून त्याच्या मागे – पुढे, तर काही कॅरीयरवर तर काही पुढच्या दांडीवर ही मुले बसली आहेत.. काही मुळे तर त्याच्या अंगावर देखील बसली आहेत.. यातील काही मुले शाळेच्या वेशात असून काही मुलांनी रंगबिरंगी कपडे घातली आहेत..

या सायकलच्या हँडलला मुलांच्या बॅगाही लटकवलेल्या दिसत आहेत.. या व्यक्तीला अशाप्रकारे नियमितपणे सायकलवर जाण्याची सवय असावी, असे दिसते.. हा व्हिडीओ एका गावातील असून त्या वडिलांवर काय परिस्थिती आल्याने त्यांना असे करावे लागत आहे असा प्रश्न आपल्याला पडतो..

हा व्हायरल व्हिडीओ पाहून काहींनी ‘ती त्यांचीच मुले असतील असे काही नाही,’ अशीही प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी त्यांची ‘यावरून त्यांची गरिबी दिसून येते..’ असेही म्हंटले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *