महत्वाच्या घडामोडी

सासरच्यांनी संपवले विवाहितेचे जीवन, तब्बल १३ महिन्यानंतर लागला तपास…

प्रतिनिधी / मुंबई

सानिया शेख या २५ वर्षीय महिलेच्या हत्येचा तब्बल १३ महिन्यानंतर छडा लागला आहे.. वसईतील भुईगाव समुद्र किनाऱ्यावर डोकं नसलेला मृतदेह सापडला आहे.. तो मृतदेह सानिया शेख हिचाच असल्याचा खुलासा झाला आहे.. सानियाची हत्या संपूर्ण शेख कुटुंबानेच अगदी निर्दयपने केल्याची उघडकीस आली आहे.. याआधी या प्रकरणी पोलिसांनी सानियाच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती, मात्र या प्रकरणी आता आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे..

या हत्येत सानियाचा सासरा, दीर आणि मेहुणा यांच्यासह संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याचे समोर आले आहे.. शेख कुटुंबाने सानियाला पाण्यात १५ मिनिटे बुडवून निर्घुणपणे मारले आणि नंतर तिचा गळा चिरून धडापासून डोकं वेगळ केलं आहे.. हत्येच्या दिवशी सानिया आणि तिचा नवरा आसिफ शेख यांच्यात जोरदार भांडणं झाली होती.. सानियाची हत्या झाली त्या दिवशी बकरी ईद होती.. बकरी ईदच्या दिवशी सानिया भांडण करते म्हणून तिला तिला याच दिवशी मारण्याचा कट संपूर्ण कुटुंबाने रचला..

सानियाचा पती आसिफ याने तिला बेडरूमध्ये नेवून जबर मारहाण केली.. त्यानंतर तिचे हात – पाय बांधून ठेवले, आणि काही वेळाने तिचा गळा आवळला.. मात्र तरीही सानियाचा जीव जात नव्हता.. अखेर शेख कुटुंबीयांनी सानियाच तोंड पाण्याने भरलेल्या बादलीत १५ मी. दाबून ठेवले.. सानिया जीव वाचवण्यासाठी तडफडत होती, मात्र तिच्या या तडफडण्याचा कोणताच परिणाम आसिफ आणि त्याच्या कुटुंबावर झाला नाही.. अखेर तडफडत तडफडत सानियाचा जीव गेला..

सानियाचा मृत्यू झाल्यानंतर पती आसिफ आणि त्याचे वडील हनीफ शेख यांनी तिचं डोकं कापायचं ठरवलं.. त्यानंतर आसिफने घरातून मटन कापायचा सुरा आणला आणि सानियाचा गळा कापण्यास सुरवात केली.. मात्र गळा कापत असताना आसिफला चक्कर आली आणि त्याच्या हातातून सुरा आसिफच्या बापाने घेतला आणि काही क्षणातच सानियाच डोकं धडापासून वेगळ केलं.. एवढ्यावरच न थांबता कोणाला संशय येवू नये म्हणून त्यांनी सानियाच्या डोक्यावरचे केस ट्रीमर मशिनच्या साह्याने कापले.. त्यानंतर तिच्या ओठांवर एक मोठा काळा तीळ होता तोही चाकूच्या सहाय्याने कापून टाकला.. त्यानंतर त्यांनी सानियाच डोकं एका पिशवीत प्यैक केलं आणि स्वतःच्या दुचाकीने भावाबरोबर हायवे वरील खानिवडे येथील पुलावरून खाडीत फेकून दिलं.. हे कृत्य त्यांनी रात्रीच्या सुमारास अंधारात केले आहे..

आसिफ घरी आल्यानंतर त्याचा मेव्हुनाही घरी आला होता.. त्याच दिवशी आसिफ, त्याचे वडील आणि मेव्हुना युसुफ या तिघांनी मिळून सानियाचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि एका ट्रोली ब्यैगेत टाकला.. त्यानंतर सानियाचा मृतदेह युसुफच्या ओला कारने खाडीत नेवून टाकला.. या हत्येप्रकरणी वसई पोलिसांनी सानियाचे पती आसिफ शेख, सासरे हनीफ शेख, दीर यानिश शेख आणि मेव्हुना युसुफ शेख यांना अटक केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *