महत्वाच्या घडामोडी

रुग्णालयात महिला अधिकाऱ्यासमोरच झाल असं काही ,अधिकाऱ्यांना अश्रू अनावर पहा व्हिडीओत नक्की काय घडल ?

उत्तर प्रदेश /लखीमपुर

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे ट्रक आणि बस मध्ये झालेल्या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला होता तर ४१ लोक जखमी आहेत .जखमी लोकांवर जिल्हा रुग्ण्यालयात उपचार सुरु आहेत .त्यातील १२ जणांना लखनौ च्या ट्रामा center मध्ये हलवण्यात आले आले .

यावेळी लखनौ च्या विभागीय आयुक्त रोशन जाकब यांनी जखमींची भेट घेत कुटुंबियांशी सवांद साधला .यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल झाला आहे .यात त्या जखमी मुलाची चौकशी करताना दिसत आहेत.

त्या मुलाला होनाऱ्या वेदना पाहून त्यांना अश्रु अनावर झाले .त्यांनी मुलाला धीर देण्याचाही प्रयत्न केला.यातूनच त्यांचा साधेपना आणि माणूसकी दिसून येते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *