महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! रोटा व्हेटरमध्ये अडकून एका तरुण शेतकऱ्याचा अंत…

प्रतिनिधी / औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.. सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरु असून शेतकरी हे शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहेत.. अशातच एक शेतकरी तरुण शेतीची मशागत करत असताना रोटा व्हेटरमध्ये अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे..

सूरज भवार ( वय – २७ ) असे या मृत झालेल्या शेतकरी तरुणाचे नाव आहे.. बाभुळगावच्या गंगा शिवारात सूरज भवार यांची शेती आहे.. सूरज हे रात्रीच्या वेळी शेतात आपल्या रोटा व्हेटरने मशागत करत असताना अचानक रोटा व्हेटरची सेटिंग बिघडली..

त्यानंतर रोटा व्हेटर नीट करण्याचा प्रयत्न करत असताना सूरज हे मशीनमध्ये अडकले गेले.. आणि या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शेतात रोटा व्हेटर चालू असून एकाच जागेवर उभे असल्याचे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आले..

यावेळी या शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.. या घटनेची माहिती तात्काळ शेतकऱ्यांनी सूरज भवार यांच्या कुटुंबियांना दिली.. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.. आणि अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..

सूरज भवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.. सूरज भवार यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *