महत्वाच्या घडामोडी

रिक्षा चालकाचा मुलगा जिद्दीने बनला IAS…

प्रतिनिधी / वाराणसी

कठीण काळ असतानाही त्याच्यावर मात करून एका रिक्षा चालकाने आपल्या मुलाला IAS अधिकारी केले आहे, आणि सूनही IPS घरी आणली आहे.. नारायण जायसवाल असे या रिक्षा चालकाचे नाव आहे.. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे.. नारायण यांच्याकडे एकून ३५ रिक्षा होत्या.. त्या रिक्षा त्यांनी भाड्याने चालवण्यासाठी दिल्या होत्या.. परंतु, त्यांची पत्नी इंदू ह्या आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी त्यांनी जवळपास २० हून अधिक रिक्षा विकल्या होत्या..

मात्र एवढे करूनही नारायण यांच्या पत्नीचे निधन झाले.. तेव्हा नारायण यांचा मुलगा गोविंद हा सातवीत शिकत होता.. बाकीच्या उरलेल्या रिक्षा नारायण यांना आपल्या मुलींच्या लग्नात विकाव्या लागल्या होत्या.. आणि त्यांच्याकडे आता एकच रिक्षा उरली होती, ती रिक्षा ते स्वतः चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.. नारायण हे आपल्या मुलाला रोज शाळेत सोडायला जात होते.. तेव्हा शाळेतील मुलं त्याला आला बघा ‘ रिक्षावाल्याचा मुलगा ‘ असे टोमणे द्यायचे..

नारायण जायसवाल हे जेव्हा लोकांना सांगायचे की मी माझ्या मुलाला IAS बनवणार आहे, तेव्हा लोकं त्यांच्यावर हसायची.. परंतु, नारायण यांनी जिद्द सोडली नाही.. त्यांचा मुलगा गोविंद यालाही परिस्थितीची जाणीव होती.. गोविंद हा रद्दीच्या पुस्तकातून अभ्यास करत होता, त्यानेही खूप मेहनत घेतली होती.. गोविंद याने UPSC ची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात तो ४८ वा क्रमांक पटकावून IAS अधिकारी झाला.. त्यानंतर गोविंद यांच्या मोठ्या बहिणीला चंदना यांच्याबद्दल समजले.. चंदना यांचीही IPS मध्ये निवड झाली होती.. ममता आणि गोविंद यांनी सायबर केफेमध्ये जाऊन चंदना यांची प्रोफाईल पाहिली.. गोविंद यांनादेखील चंदना या जोडीदार म्हणून योग्य वाटल्या आणि गोविंद व चंदना हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *