सामाजिक

शिक्षक दिनाचे खरे मानकरी – महात्मा फुले की राधाकृष्णन सर्वपल्ली…

आज ०५ सप्टेंबर.. राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.. मात्र, मागल्या काही वर्षांपासून शिक्षक दिन नेमका कोणत्या तारखेला असावा या विषयी मत-मतांतरे असल्याचं दिसून येतं.. महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी राज्यात सर्वप्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.. पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.. त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम अतुलनीय आहे.. त्यामुळे खरा शिक्षक दिन हा ०५ सप्टेंबर ऐवजी ११ एप्रिल म्हणजेच महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनादिवशी घ्यावा अशी काही संघटनांची आग्रही मागणी आहे..

आता आपण महात्मा फुले आणि राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या शैक्षणिक कामाचा आलेख थोडक्यात समजून घेऊ..

महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.. तर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला.. यावरून महात्मा फुले याचं शैक्षणिक कार्य राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या आधीचं असल्याचं सिद्ध होतं.. महात्मा फुले यांनी १८४८ टे १८५१ या चार वर्षात २० शाळा सुरु केल्या.. तर, राधाकृष्णन यांनी संपूर्ण आयुष्यात एकही शाळा सुरु केली नाही..

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आख्खं आयुष्य बहुजनांना विना मोबदला शिकवण्याचं कार्य केलं.. राधाकृष्णन सर्वपल्ली यांनी गलेलठ्ठ पगार घेऊनही बहुजनांच्या मुलांना शिकवलं नाही.. महात्मा जोतीराव फुले हे विज्ञानवादाचा पुरस्कार करणारे होते.. अनिष्ठ प्रथा, स्वर्ग – नरक संकल्पना त्यांना अमान्य होत्या.. ते प्रचंड पुरोगामी व प्रयत्नवादी होते.. याउलट राधाकृष्णन सर्वपल्ली देववादी , प्रतिगामी विचारांचा पुरस्कार करणारे होते..

लग्न करताना एकमेकांचे शिक्षण आणि एकमेकांच्या आवडीनिवडी पाहून निर्णय घ्यावा अशी मांडणी महात्मा फुले यांनी केली.. तर, लग्नगाठ ही स्वर्गात बांधली जाते या मतावर राधाकृष्णन सर्वपल्ली ठाम होते.. महात्मा फुले यांनी बालविवाह आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं, मात्र राधाकृष्णन सर्वपल्ली यांनी आपल्या मुलीचा विवाह बालवयातच केला.. महात्मा फुले यांनी देशात सर्व प्रथम शिक्षणास सुरवात केली..

या काही मुद्यावरून असं लक्ष्यात येत की, राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्याही पुढे जाऊन महात्मा जोतीराव फुले याचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान भरीव आणि मोलाचं आहे.. या मुद्यांच्या आधारावरच काही सामाजिक संघटना व विचारवंत महात्मा फुले यांच्या जयंती दिवशीच शिक्षक दिन असावा यासाठी आग्रही असतात..

असं असलं तरी राधाकृष्णन सर्वपल्ली याचं शिक्षण क्षेत्रातलं योगदानही नाकारता येत नाही….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *