महत्वाच्या घडामोडी

रस्त्याच्या कडेला, पुलाखाली गरीब मुलांना शिकवते ही मुलगी.. पाहा हा मन जिंकणारा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

आजच्या युगात गरिबीमुळे तसेच उदरनिर्वाहामुळे अनेक मुलांचे बालपण असेच निघून जाते.. ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात.. अनेक मुलांना इच्छा असूनही गरिबीमुळे शाळेचा चेहराही पाहता येत नाही.. मात्र अशा परिस्थितीत या गरीब मुलांसाठी एक मुलगी वरदान ठरत आहे..

या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.. ही मुलगी शिक्षणापासून कोणतेही मूल वंचित राहू नये यासाठी आपल्या व्यस्त दिनचर्येतून महत्त्वाचा वेळ काढून या गरीब व असहाय मुलांना शिकवत आहे..

या व्हिडीओमधील मुलगी फ्लायओव्हरच्या खाली रस्त्यावरील गरीब मुलांना शिकवताना दिसत आहे.. या मुलीने एक पांढरा फलक लावला आहे, जेणेकरून ती सर्व मुलांना गोष्टी समजावून सांगू शकेल.. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून सर्वांनी या मुलीचे कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *