महत्वाच्या घडामोडी

पुराच्या पाण्यात स्कूटीसह महाविद्यालयीन तरुणी गेली वाहून , तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…

प्रतिनिधी / नाशिक

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एका महाविद्यालयीन तरुणी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. तन्वी विजय गायकवाड ( वय – १७ ) असे या तरुणीचे नाव आहे.. तन्वी आपल्या मामाकडे शिवडी येथे रहात होती.. रानवड साखर कारखाना येथे असलेल्या काकासाहेब वाघ कनिष्ट महाविद्यालयात अकरावीमध्ये तन्वी शिक्षण घेत होती..

तन्वी ही शिवडी येथून काकासाहेब नगर येथे दररोज आपल्या स्कूटीवर ये जा करत होती.. जिल्ह्यात ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने दोन्ही गावच्या मधून वाहणारी विनता नदीला अचानक पाणी वाढले होते.. तन्वी सकाळी महाविद्यालयात जात असतांना नदी पार करत होती.. तन्वीला पूरपरिस्थितीचे गांभीर्य व पाण्याचा अंदाज न आल्याने तिने आपली बॅटरीवरील स्कूटी पाण्यात घातली आणि अचानक बॅटरी संपल्याने तिने स्कूटी धरूनच ठेवली, त्यामुळे स्कूटीसह तन्वी पुराच्या पाण्यात वाहून गेली.. काही अंतरावर असलेल्या संत जनार्दन स्वामी पर्णकुटीजवळ तन्वी दिसली.. तातडीने तिला निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र त्यापूर्वीच तन्वीचा मृत्यू झाला होता.. तन्वीचे वडील विजय गायकवाड हे काकासाहेब वाघ कनिष्ट महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *