महत्वाच्या घडामोडी

पुराच्या पाण्यात पडल्यानंतर तरुण वाहत जाऊन बायकोला भेटला.. पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / पुणे

सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथील एका तरुणासोबत एक मजेशीर घटना घडली आहे.. सागर अरविंद पाटील ( वय – २९ ) असे या तरुणाचे नाव आहे.. हा तरुण पुराच्या पाण्यात पडल्यानंतर थेट पोहत जाऊन आपल्या पत्नीच्याच घरी पोहोचला.. प्रिया सागर पाटील असे या पत्नीचे नाव आहे.. प्रिया या रांजणगाव येथे कामाला आहेत..

सागर हा आपली पत्नी प्रिया हिला दिवाळीसाठी घरी जेऊन जाण्यासाठी दुचाकीवर रांजणगावला निघाला होता.. मोरगाव – मुर्टी या रस्त्यावरील जाधव वस्तीशेजारी होलकुंडच्या ओढ्यातून निघाला होता.. या ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर आले होते..

मात्र सागर पाटील हा आपली दुचाकी या पाण्यातून घालण्याचा प्रयत्न करू लागला.. त्यावेळी तिथे असलेल्या हॉटेल सानिकाच्या मॅनेजरने ‘पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आतमध्ये जाऊ नकोस ‘, असे सांगितले परंतु सागरने त्याचे बोलणे न ऐकता दुचाकी पाण्यात घातली आणि तो ओढ्यात वाहून गेला..

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावातील तरुणांच्या मदतीने सागर पाटील याचा शोध घेण्यास सुरवात केली.. एका झाडाला अडकलेली सागर याची गाडी सापडली परंतु त्याचा तपास लागला नाही.. गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी सागर याचा तपास सुरु केला..

हा तपास सुरु असताना सागर हा सांगली जिल्ह्यातील कडेपूरचा असल्याचे समजले.. पोलिसांनी कडेपूरच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.. त्यावेळी पोलिसांकडून सागर हा पुराच्या पाण्यातून पोहून बाहेर निघून थेट आपल्या बायकोजवळ म्हणजेच रांजणगाव येथे पोहोचला असल्याचे समजले..

या झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी सागरला जाब विचारला असता त्याने सांगितले की, माझी बायको रांजणगाव येथे कामाला आहे.. तिला दिवाळीसाठी घरी आणायला मी काल कऱ्हाड येथून उशिरा निघालो.. मुर्टीच्या ओढ्यात अचानक पाणी वाढल्याने मी पुराच्या पाण्यात वाहत गेलो.. परंतु मला पोहता येत असल्यामुळे मी एका झाडाचा आधार घेत बाहेर निघालो आणि एका ट्रकला हात करून रांजणगाव येथे पोहोचलो.. सागरच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *