महत्वाच्या घडामोडी

पुराच्या पाण्यात बुडून बाप-लेकीचा अंत, पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / फलटण

फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका पिता- पुत्रीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.. छगन उत्तम मदने ( वय – ३८ ) व प्रांजल छगन मदने ( वय – १३ ) अशी या बाप लेकीची नावे आहेत..

छगन मदने हे सोमंथळी येथे त्यांचे सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी रात्री उशिरा येत होते.. मात्र, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमंथळी – सस्तेवाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला भरपूर प्रमाणात पाणी आले होते.. अक्षरशः पुलावरून पाणी वाहात होते..

या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार पुराच्या पाण्यात वाहून गेली.. या कारमध्ये असणाऱ्या छगन मदने आणि त्यांची मुलगी प्रांजल यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. छगन मदने हे जम्मू – काश्मीरमध्ये सैन्य दलात देशसेवा करत होते..

छगन मदने हे दिवाळीसाठी चार दिवस गावी सुट्टीवर आले होते.. सकाळी जेसीबीच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली.. आणि छगन आणि प्रांजल यांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.. या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली असून परिसरातही सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *