महत्वाच्या घडामोडी

प्रवाशांनी भरलेली बस पुराच्या पाण्यात अडकली, पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ…

प्रतिनिधी / शिर्डी

राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.. मात्र अशा पूरपरिस्थितीतही नागरिक जलमय झालेल्या रस्त्यावरून जाण्याचे धाडस करत आहेत..

असच धाडस एका बस चालकाच्या अंगलट आले आहे.. कर्नाटक परिवहन मंडळाची कर्नाटक – शिर्डी बस एका पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.. रात्रभर झालेल्या अति मुसळधार पावसामुळे शिर्डी नजीक असलेला नगर- मनमाड महामार्ग पाण्याखाली गेला होता..

यामुळे महामार्गा शेजारील ओढ्याला पूर आला असल्याने रस्त्यात शेकडो वाहने अडकली होती.. अशातच एका बस चालकाने प्रवाशांनी भरलेली बस या पुराच्या पाण्यातून नेण्याचे धाडस केले आहे.. ही बस पूर्ण एक तास पुराच्या पाण्यात अडकली होती..

बस अडकल्यामुळे चालकाची चांगलीच फजिती झाली होती.. यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने येथील स्थानिक नागरिकांना बसमधून बाहेर काढण्यात आले आहे.. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *