महत्वाच्या घडामोडी

पुणेकरांचे हेही रूप पाहावे , वाचा नक्की काय घडलं ?

प्रतिनिधी / पुणे

पुणेकर नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात.. पुणेकरांवर केलेले खूप जोक वाचले असतील, त्यांच्यावर हसणाऱ्यांनी पुणेकरांचे हेही रूप पहावे, आणि कौतुक करावे..

पाहा ना आता पुणेकरांचे हे रूप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर झालेल्या एका विचित्र अपघातात बस खाली सापडलेल्या दोघा जणांना वाचवण्यासाठी पुणेकरांनी सामूहिक प्रयत्न करत बस उचलून धरली आणि पडलेल्या माणसाला वाचवले.. आणि बस खालून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले.. ज्या पुणेकरांनी या दोघांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले त्यांना सलाम., या बातमीमुळे पुणेकरांवर सोशल मिडीयावरून कौतुकांचा वर्षाव केला जातोय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *