महत्वाच्या घडामोडी

ठेकेदार-आमदार समाधान आवताडे यांच्या ऑफिस समोरचे खड्डे ‘मनसे’ने बुजवले

एबी मराठी न्यूज नेटवर्क,

पंढरपूर शहरात पावसामुळे सर्वच भागात प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .अनेक नागरिकांचे या खड्ड्यामुळे अपघात झालेले आहेत, काल दोन महिला या भक्तिमार्गाकडून येत असताना आमदार समाधान आवताडे यांच्या ऑफिससमोरच्या खड्ड्यामध्ये पडून जखमी झाल्या आहेत.

 परंतु नगरपालिकेला जाग येत नाही ,सक्षम नगरपालिका आहे म्हणणारे काही करत नाहीत म्हणून पंढरपूर शहरातील सर्व खड्डे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने सिमेंट काँक्रेटने बुजवण्यात येणार आहेत .

पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या ऑफिस जवळील खड्डे काल मनसेच्य वतीने बुजवण्यात आले आहेत..

पंढरपूर शहरातील सावरकर चौक, स्टेशन रोड ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,नगरपालिका ,डीवायएसपी ऑफिस समोर बोगदाजवळील, सरगम चौक येथील सर्व खड्डे बुजवणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे..

ठेकेदार आमदार असलेल्या आमदार समाधान आवताडे यांच्या ऑफिससमोरचे खड्डे मनसेने बुजवले असल्याने काल दिवसभर पंढरपुरात खमंग चर्चा रंगली होती…

आमदार समाधान आवताडे यांच्या ऑफिससमोरील खड्डे बुजवताना मनसे नेते दिलीप धोत्रे व अन्य पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *