महत्वाच्या घडामोडी

प्रीती काळे हिचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते सत्कार

एबी मराठी न्यूज नेटवर्क

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोली संचलित , वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांतील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची राष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू कु. प्रीती अशोक काळे  हरियाणा पंचकुला येथे झालेल्या  खेलो – इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत  महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक मिळविल्याबद्दल आज रविवार दि. १६ आॕक्टोंबर २०२२ रोजी विद्याप्रतिष्ठान बारामती येथे महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व K K SPORT’S  चे मार्गदर्शक  कल्याण काळे सचिव बाळासाहेब काळे  उपस्थित होते.

 यावेळी भविष्यातील  वाटचालीसाठी अजितदादा पवार साहेब यांनी प्रीती काळे हिला शुभेच्छा देऊन जिद्द मेहनत व परिश्रमाने अधिक यश मिळवत रहा असे सांगून आशीर्वाद दिले.

प्रीती काळे पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून आजपर्यंत तिने 6 राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना सिवर्णपदक मिळवले आहे. ग्रामीण भागात जर क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या तर अनेक गुणवान खेळाडू तयार होतात जिद्द कठीण परिश्रम आणि सरावातील सातत्य आसेल तर यशाला गवसणी घालता येते हेच प्रीती काळे हिने मिळवलेल्या यशामधून दिसून येते . शेतकरी कुटुंबात जन्म होऊनही जिद्दीने मिळवलेले प्रीतीचे यश हे मुलींसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *