क्राईम

प्रेयसीने संपवले प्रियकराच्या पत्नीचे जीवन.. पाहा हा धक्कादायक व्हिडीओ…

प्रतिनिधी / राजगुरुनगर

राजगुरुनगर येथे एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.. येथे एका प्रेयसीनेच आपल्या प्रियकराच्या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे..

कोमल गणेश केदारी ( वय – २८ ) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे.. तर स्वाती सुभाष रेंगडे ( वय – २१ ) असे खून केलेल्या आरोपी प्रेयसीचे नाव आहे..

कोमल केदारी हिचे पती कंपनीत कामाला गेल्यानंतर ती घरात एकटीच होती.. त्यानंतर कोमल हिचा गळा आवळून खून केल्याची तक्रार कोमलचा पती गणेश केदारी याने खेड पोलीस ठाण्यात दिली होती..

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरु केला होता.. त्यानंतर या गुन्ह्यातील संशयित महिला स्वाती रेंगडे हिला पोलिसांनी जुन्नर येथून मोबाईल लोकेशन व मोबाईलवरील मेसेज व फोन याच्या माध्यमातून तपास करून ताब्यात घेतले आहे..

सुरवातीला तपास सुरु असताना स्वाती रेंगडे हिने उडवाउडवीची उत्तरे दिली.. परंतु अधिक तपास केल्यानंतर स्वाती हिने आपला गुन्हा कबुल केला.. गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी स्वातीला अटक केली आहे.. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *