महत्वाच्या घडामोडी

रुग्णालयातून चेकअप करून पतीसोबत घरी परतत असताना महिलेसोबत घडलं असं काही…

प्रतिनिधी / पुणे

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारूळवाडी येथे एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे.. येथे एका गरोदर महिलेचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून जागीच मृत्यू झाला आहे.. विद्या रमेश कानसकर ( वय – २२ ) असे मृत झालेल्या गरोदर महिलेचे नाव आहे..

विद्या या जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील रहिवासी आहेत.. त्या आपल्या पती आणि आईसोबत नारायणगाव येथे चेकअपसाठी आल्या होत्या.. चेकअप करून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे..

विद्या या गाडीवरून जात असताना रस्त्यात गतिरोधक आला म्हणून त्या गाडीवरून खाली उतरल्या आणि समोरून येणाऱ्या दोन जोडणाऱ्या ट्रॉलीभरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा विद्याला धक्का लागला आणि ती रस्त्यावर पडली.. खाली पडल्यानंतर विद्या यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले..

विद्या यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. विद्या या गरोदर असल्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *