महत्वाच्या घडामोडी

प्रसूतीनंतर अवघ्या दहा तासांनी आईने दिला पेपर…

प्रतिनिधी / राजस्थान

शाळेचा एकही दिवस न बुडवणारी आणि रोज शाळेत वेळेवर जाणारी अनेक मुलं आपण पाहिली आहेत.. तसेच लग्नाआधी परीक्षेला आलेल्या अनेक वधू- वरांना देखील आपण पाहिलं असेल.. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मनातून शाळा कधी जात नाही हे मात्र खरे आहे.. अशाच एका महिलेबद्दल आपण जाणून घेणार आहोत.. लक्ष्मी मीना असे या महिलेचे नाव असून ती राजस्थानच्या झुंझुनूची आहे..

लक्ष्मी ही बीएडच्या पहिल्या वर्षात शिकत असून, परीक्षा देऊन घरी आल्यानंतर तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या.. त्यानंतर सूरजगड मध्ये लक्ष्मीची प्रसूती झाली आणि परीक्षाही तिने सूरजगड मधेच दिली.. लक्ष्मीने मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा एक पेपर शिल्लक होता आणि अशा परिस्थितीतही तिने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.. लक्ष्मी हिची १५ तासांपूर्वीच प्रसूती झाली होती आणि तिने रुग्णवाहिकेतच तिची परीक्षा दिली.. लक्ष्मीचे पती श्यामलाल हे शेती करतात.. लक्ष्मी ही रेल्वेच्या परीक्षेची तयारी करत आहे.. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *