महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! अपघाताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच भरधाव कारने चिरडले…

प्रतिनिधी / पारशिवनी

पारशिवनी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका अपघाताचा पंचनामा सुरु असताना एका भरधाव कारने पोलिसासह आठ लोकांना उडविले आहे.. यामध्ये पोलिसाचा मृत्यू झाला असून इतर सात जण जखमी झाले आहेत..

जयंत विष्णू शेरेकर ( वय – ४२ ) असे या मृत्यू झालेल्या हवालदाराचे नाव आहे.. नयाकुंडनजीकच्या सूतगिरणीजवळ कार व ट्रकची धडक झाली.. आमटी फाटा ते पारशिवनी रस्त्यावरील नयाकुंड येथील सूतगिरणीपासून एक किमी अंतरावर हा अपघात घडला आहे.. या अपघातात कार चालक विक्रमसिंग भैस कारमध्ये अडकला..

पारशिवनी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.. त्यानंतर हवालदार जयंत शेरेकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.. त्यानंतर विक्रमसिंग यांना कारबाहेर काढण्यात आले.. यानंतर जयंत शेरेकर एक पोलीस मौका पंचनामा करत होते..

याच दरम्यान आमटी फाट्याकडून एक कार भरधाव वेगाने घटनास्थळाकडे येत होती.. आणि ह्या कार चालकाने काही कळायच्या आत रस्त्यावर उभे असलेले हवालदार जयंत शेरेकर यांच्यासह इतर जणांना जोरदार धडक दिली..

धडक दिल्यानंतर जयंत शेरेकर आणि इतरांना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. परंतु उपचारादरम्यान हवालदार जयंत शेरेकर यांच्या मृत्यू झाला आणि जखमींना नागपूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले..

यानंतर पारशिवनी पोलिसांनी अपघात घडवणारी कार जप्त केली आहे.. परंतु कारमधील व्यक्ती फरार झालेला आहेत.. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *