क्राईम

पोलीस भरती करताना तरुणीचा झाला मृत्यू…

प्रतिनिधी /अकोला

सध्या अनेक तरुण तरुणी मोठ्या कष्टाने पोलीस भरतीच्या तयारीला लागलेले आपण पाहत असतो ,मात्र अश्याच तयारी करणाऱ्या एका मुलीचा धक्क्कादाय्क मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना अकोला येथे घडली आहे ,एका २२ वर्षीय तरुणी मैदानावर धावत असताना अचानक खाली कोसळली व तिचा मृत्यू झालाय .

रोशनी अनिल वानखेडे वय २२ असं मृत मुलीचं नाव असून ती अकोला तालूक्यातील धोतार्डी या गावची रहिवासी आहे .गेल्या काही दिवसात ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी शहरात राहायला आली होती

नेहमीप्रमाने धावत असता तिला चक्कर अली यावेळी तिला तत्काळ रुग्णालयात नेल मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं .पोलीस होऊन कुटुंबाला हातभर लावायचा असं तिचं स्वप्न होत पण पोलीस होण्याच तिचं स्वप्न अधुरच राहील .या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *