महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! पत्नीचे केस पांढरे झाले म्हणून पतीने केलं असं काही…

प्रतिनिधी / पाटणा

बिहारमधल्या सारण जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.. येथे पत्नीचे केस दोन वर्षातच पांढरे झाले म्हणून पती दुसरा विवाह करायला निघाला होता..

बबिता देवी असे पत्नीचे नाव असून पंकज साह असे पतीचे नाव आहे.. या दोघांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता.. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता..

पंकज याने लग्नाच्या दोन वर्षानंतर आपल्या पत्नीचे पांढरे झालेला केस पाहिल्यानंतर घरात गोंधळ घालायला सुरवात केली.. यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला.. पंकज हा पत्नी बबिता हिला सतत तिच्या पांढऱ्या केसांवरून टोमणे मारत असे..

पंकज हा पांढऱ्या केसांच्या कारणावरून बबिता हिचा छळ करत असे.. या गोष्टींची फिर्याद बबिता हिने पोलीस ठाण्यात दिली होती.. त्यानंतर पोलिसांनी समज देऊन दोघांमध्ये तडजोड करून दिली होती.. परंतु पंकजच्या मनात काही वेगळेच होते.. त्याने लपून दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता..

पंकज हा काल संध्याकाळी दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होता.. ही माहिती तेथील स्थानिक लोकांनी बबिताला दिली.. त्यानंतर बबिता ही आपल्या वडिलांना घेऊन घटनास्थळी पोहोचली आणि तिने पती पंकज याला मारहाण करण्यास सुरवात केली..

या प्रकारानंतर पंकजसह सर्वजण मंदिरातून पळून गेले.. बबिताच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *