महत्वाच्या घडामोडी

पतीने केले २० वर्षीय बायकोचे टक्कल ! कारण ऐकून बसेल धक्का…

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका पतीने आपल्या पत्नीला कोणत्याही परपुरुषाने पाहू नये म्हणून चक्क तिचे टक्कल केले आहे.. हा संतापजनक प्रकार एका २० वर्षीय विवाहितेसोबत घडला आहे..

सुमैय्या चौधरी ( वय – २० ) असे या पिडीत महिलेचे नाव आहे.. पिडीत सुमैय्याने आपली ही व्यथा ३ महिन्यानंतर पोलिसांसमोर मांडली आहे.. सुमैय्या हिचा विवाह जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरी याच्या सोबत झाला होता..

सुमैय्याचा संसार लग्नानंतर दोन महिने सुरळीत चालू होता.. नंतर कलीम चौधरी हा सुमैय्यावर संशय घेऊ लागला आणि सतत तिला त्रास देऊ लागला.. काही काळ पतीचा त्रास सुमैय्याने सहनदेखील केला.. परंतु अखेर तिची सहनशक्ती संपली आणि सुमैय्याने पोलिसात तक्रार केली..

सुमैय्याने आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.. जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये या अजब प्रकाराबाबत आरोपी पती कलीम चौधरी याच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *