महत्वाच्या घडामोडी

यंदा पंढरीत दिवाळी होणार धुमधडाक्यात , बाजारपेठा फुलल्या …..

प्रतिनिधी /पंढरपुर

यंदा कोरोनाची भितीपूर्ण दोन वर्ष दूर झालेली आहेत .राज्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे .धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे .त्या मुळे शेतकऱ्यांन मध्ये समाधानाची भावना आहे .या हंगामातील उस गाळपासाठी सर्व कारखाने सज्ज झाले आहेत .जवळपास सर्व कारखान्याकडून दिवाळीचे बील शेतकऱ्याना मिळाले आहेत. ठप्प असलेले व्यवसाय छोटे -मोठे उद्योग पुन्हा नव्याने सुरु होत आहेत. त्यामुळे लोकांच्या हाताला परत काम मिळत आहे .आणि म्हणूनच या वेळी दिवाळी ची नवीन खरेदी जसे की विविध प्रकारची वाहने ,किराना मालाची दुकाने ,फराळ ,फटाके ,कपडे दिवाळीच्या शोभेच्या वस्तू आकाश कंदील ,पणत्या ,शेती अवजारे या दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन वर्षा पासून पेक्षा अधिक काळ कोरोना महामारी ने व्यापारी व व्यावसायिकांना बाजारपेठा पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता काहींचे उद्योग पूर्णपणे बंद झालेले दिसून आले होते मात्र आता ही परीस्ठीती सुरळीत चालू झालेली आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये व्यापारी वर्ग दुकानदार यांच्या कडून ही दिवाळी आनंदमय व उत्साहात पूर्ण साजरी होणार असे चित्र दिसत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *