महत्वाच्या घडामोडी

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून खबरदारी

कोरोना वाढीच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमधून येत असताना आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनेही त्या संदर्भात दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.. या बद्दल  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी अधिकची माहिती दिली आहे..

आज शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळ पासून मंदिरात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना मास्क सक्तीचा केला आहे, मात्र भाविकांना अद्याप मास्कची सक्ती करण्यात आली नाही..

भाविकांना मास्कची सक्ती करण्यात आली नसली तरीही भाविकांनी मात्र मास्कचा वापर करावा असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे, त्यासाठी खबरदारी म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांना मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे..

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *