महत्वाच्या घडामोडी

पंढरपूर जवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात ,बसमधील महिलेचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी /पंढरपूर

पंढरपूर जवळच्या सोनके गावा जवळ एसटी बस आणि माल वाहतूक ट्रकचा आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात बस मधील सुंदराबाई माने ( रा.फळवणी ता.माळशिरस) या महिलेचा जागीच  मृत्यू झाला आहे. 

आटपाडी आगाराची बस पंढरपूर हून सांगलीकडे जात असताना ओव्हर टेक करताना हा भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघाताची नोंद  पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात  करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *