राजकारण,निवडणूक

पंढरपूरात घडली खळबळजनक घटना !मुतारीची आत्महत्या…?

प्रतिनिधी / पंढरपूर

पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या जाचास कंटाळून यमाई – तुकाई मंदिरा शेजारील स्व.यशवंतराव चव्हाण जलाशयाच्या ट्रकवरील तळ्यात उडी मारुन मुतारीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पंढरपूर मध्ये घडली आहे.मुतारीचे प्रेत तळ्याकाठी तरंगताना नागरीकांना आढळून आले आहे.

त्यामुळे ट्रकवर फिरायला येणार्‍या तुंबलेल्या मान्यवरांसह अनेकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.काही जनांनी मुतारीची आत्महत्या नसून आरोग्य विभागाने केलेली हत्या आहे.असा दावा केलेला आहे.

याबाबत नगरपरिषदेचे मा.मुख्यधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता,त्यांना चंद्रावरील खड्डे मुरमाने बुजवण्याचे इस्त्रो कडून काम मिळाल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना सर्वात आधी कळविण्याची प्रथा असल्यामुळे आम्ही सोशल मिडीया द्वारे पंढरपूर नगरपरिषदेस ही दु:खद घटना कळवित आहोत.

मुतारीला भावपुर्ण आदरांजली…

अशी फेसबुक पोस्ट काँग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अमरजित पाटील यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर केली आहे.. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *