Uncategorized

पंढरपूर जुना अकलूज रोड वाहतुकीसाठी बंद ! शेतशिवारात शिरू लागले पाणी…

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात आणि वीर धरणातून नीरा नदीपात्रात होत असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.. ही पूरस्थिती आजही कायम राहण्याची शक्यता आहे..

त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतशिवारात हे पुराचे पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे.. तर अनेक बंधारे आणि पुलंही पाण्याखाली गेले आहेत.. पंढरपूर आणि अकलूज यांना जोडणारा जुना अकलूज रोडही  आता पाण्याखाली गेला आहे.. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र आहे.. आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये 60 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे..तर वीज निर्मितीसाठी सोडलेला 1 हजार 600 असा एकूण 61 हजार 600 एवढा विसर्ग सुरू आहे.. 

दौंड येथून उजनीमध्ये येणारा विसर्ग हा 53 हजार 800 क्यूसेक एवढा आहे.. उजनी धरण 105.70 टक्के भरलं आहे.. 

तर वीर धरणामधूनही नीरा नदीपात्रात करण्यात येत असलेला विसर्ग कायम असून आज सकाळी 6 वाजता वीर धरणामधून नीरा नदीत 33 हजार 600 क्यूसेक एवढा विसर्ग करण्यात येत आहे.. 

त्यामुळे संगम येथे भीमा नदीत सध्या 95 हजार क्यूसेक एवढा विसर्ग येतो आहे.. त्यामुळे भीमेची पूरस्थिती आजही कायम राहणार आहे..

Attachments area

2 thoughts on “पंढरपूर जुना अकलूज रोड वाहतुकीसाठी बंद ! शेतशिवारात शिरू लागले पाणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *