महत्वाच्या घडामोडी

नाद खुळा ! पाळीव कुत्र्यासोबत नवरदेवाने घेतली मंडपात जबरदस्त एन्ट्री…

प्रतिनिधी / व्हायरल

आजकाल मुलाचे लग्न असो किंवा मुलीचे लग्न असो प्रत्येकाचीच काही ना काही स्वप्ने असतात.. आपल्या लग्नात आपली एन्ट्री दमदार असली पाहिजे असे प्रत्येक मुला – मुलीला वाटत असते.. आजकाल हा ट्रेंड जोरात सुरु आहे..

सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या एका नवऱ्या मुलाच्या व्हिडीओने लोकांचे मन जिंकले आहे.. या व्हिडीओमध्येआप स्वतःच्या लग्नात एक शेरवानी घातलेला नवरदेव आपल्या पाळीव कुत्र्यासोबत बाईकवर एन्ट्री घेताना दिसत आहे..

हा लॅब्राडोर जातीचा कुत्राही या क्षणाचा खूप आनंद घेताना दिसत आहे.. लग्नाच्या निमित्ताने या कुत्र्याला वाईन कलरची शेरवानी देखील घालण्यात आली आहे.. या व्हिडीओला खूप लाईक्स मिळाल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *