महत्वाच्या घडामोडी

ती तिच्या नोकराच्या प्रेमात पडली आणि घडलं असं काही…

प्रतिनिधी / पाकिस्तान

माणूस प्रेमात पडला की वय,जात, धर्म, रंग अशा कुठल्याच गोष्टींना महत्व देत नाही.. प्रेमात माणूस काहीही करू शकतो.. अशीच एक धक्कादायक घटना पाकिस्तानात घडली आहे.. येथे एका पन्नास वर्षाच्या महिलेने आपल्या वीस वर्षाच्या नोकराच्या प्रेमात पडून लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे..

शाजिया ( वय – ५० वर्षे ) असे या महिलेचे नाव असून फारुख ( वय – २० वर्षे ) असे या तरुणाचे नाव आहे.. पाकिस्तानात शाजिया आपल्या घरात एकट्याच राहत असल्यामुळे त्यांनी फारुख याला घरात नोकर म्हणून ठेवले होते..

फारुख माझी खूप काळजी घेत असतो आणि हीच गोष्ट मला आवडली आणि मी त्याच्या प्रेमात पडले असे शाजिया यांनी सांगितले आहे.. त्यानंतर काही दिवसांतच शाजिया यांनी स्वतः फारुखला प्रपोज केले.. फारुखच्याही मागे कोणी नसल्यामुळे त्याने हे प्रपोजल मान्य केले..

शाजिया यांनी प्रपोज केलं असलं तरी मलाही शाजिया तितकीच हवी होती असे फारुख याने सांगितले आहे.. त्यानंतर दोघांनी लग्नही केले आहे.. या दोघांच्या अनोख्या प्रेमाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *