महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! तीन दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झालेल्या तरुणासोबत घडलं असं काही…

प्रतिनिधी / बिहार

   बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका स्वतःच्या  रिसेप्शनच्या दिवशीच अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.. रोषन असे या मृत तरुणाचे नाव आहे.

बगही गावातील रहिवासी असलेल्या रोशन चे छत्तीसगडच्या रायपूरची रहिवासी असलेल्या पिंकीसोबत ओळख झाली.. पुढे या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.. आणि दोघांच्या कुटुंबियांच्या सहमतीने रोशन आणि पिंकीचे लग्न झाले..

लग्न झाल्यावर तीन दिवसानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.. घरात उत्साहाचे  वातावरण होते.. रोशनसह घरातील सर्व मंडळी या कार्यक्रमाची जोरदार तयारी करत होते.. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं..

रिसेप्शनच्या दिवशी रोशन बाईकवरून आपल्या आईसोबत पूजेचे सामान आणण्यासाठी गेला होता.. त्यावेळी भरधाव येणाऱ्या एक बाईकने रोशन याच्या बाईकला जोरदार धडक दिली.. या अपघातात रोशन याचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर त्याची आई आणि दुसऱ्या बाईकवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

अपघात झाल्यानंतर या चार जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. परंतु त्याचवेळी डॉक्टरांनी रोशन याला मृत घोषित केले.. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसानंतर रोशनच्या अशा अकस्मात मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. तर रोशन याची पत्नी पिंकी हिला या घटनेने मोठा धक्का बसला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *