क्राईम

हुंड्यात बाईक न मिळाल्याने सासरच्या मंडळींनी नवविवाहिते सोबत केले असे काही…

प्रतिनिधी / उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.. येथे एका २१ वर्षीय नवविवाहित महिलेची हुंड्याच्या हव्यासापोटी हत्या करून मृतदेह नाल्याजवळील झुडपात फेकून फरार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..

हुंड्यात बाईक न दिल्याने याचा राग सासरच्या लोकांना होता.. असे सांगण्यात आले आहे.. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या लोकांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे..

मृत महिला अर्चना हिचे लग्न गौरी बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बांकी गावातील रहिवासी दुर्गेश चौहान याच्याशी झाले होते.. मात्र लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर अर्चना हिच्यावर बाईक आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला..

सासरच्या लोकांनी तिचा मारहाण करून अनेक प्रकारे छळ केला.. काही दिवसांनी अर्चना हिचे वडील तिची तब्येत विचारण्यासाठी तिच्या सासरच्या घरी गेले असता मुलीने तिला झालेला त्रास वडिलांना सांगितला आणि ती रडू लागली..

अर्चना हिने आपल्या वडिलांना सांगितले की, हुंडा म्हणून बाईक दिली नाही तर सासरचे लोक मला जीवे मारतील.. यानंतर अर्चना हिच्या वडिलांनी मी बाईक देण्यास सक्षम नसून माझ्या मुलीचा छळ करू नये असे सासरच्या मंडळींना समजावून सांगितले आणि ते तिथून गावी परतले..

मात्र त्यानंतर अर्चनाच्या वडिलांना तिचा मृतदेहच सापडला.. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *