महत्वाच्या घडामोडी

बायको तोंड धुवत असताना नवऱ्याने केलं असं काही ! पाहून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / झारखंड

झारखंड या राज्याची राजधानी असलेल्या रांचीमधील नामुक येथील लोवाडीह या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथून एका पतीने आपल्या पत्नीवर अँसिड फेकल्याची घटना समोर आली आहे.. आमीर असे या आरोपी पतीचे नाव असून हीना असे त्याच्या पत्नीचे नाव आहे..

नेहमीप्रमाणे हीना सकाळी आपला चेहरा धुवत होती.. अचानक तेथे पती आमीर आला आणि त्याने स्टिलच्या जगमध्ये ठेवलेले अँसिड हिनाच्या चेहऱ्यावर फेकले.. आणि त्यानंतर आमीर तिथून पळून गेला.. चेहऱ्यावर अँसिडचा हल्ला झाल्याने घाबरलेली हीना जोरजोराने ओरडू लागली..

हीनाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तातडीने मदतीसाठी धावून आले आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. आमीर आणि हीना यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती.. त्यांना दोन मुलेही आहेत..

आमीर हा दारू पिऊन दररोज हीनाला मारहाण करायचा.. दररोज तिच्याकडे पैशांची मागणी करत होता.. ही गोष्ट घटस्फोट घेण्यापर्यंत पोहोचली होती.. परंतु कुटुंबीयांनी अखेर हे प्रकरण मिटवले होते.. आमीर याचे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे..

आमीर हा नेहमी पैशाच्या कारणावरून हीनाचा छळ करत होता.. जेव्हा जेव्हा ती माहेरी जात होती तेव्हा तेव्हा हीना माहेरहून पैसे घेऊन सासरी येत होती अशी माहिती समोर आली आहे.. अँसिड हल्ल्यात हीना प्रचंड भाजली असून सध्या ती गंभीर जखमी आहे..

या घटनेची संपूर्ण नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.. आरोपी आमीर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *