महत्वाच्या घडामोडी

लग्न घटिका जवळ आली असतानाच नवरीने केलं असं काही, पाहून सर्वांना धक्का बसेल…

प्रतिनिधी / जळगाव

यावल तालुक्यातील अंजाळे येथील एका तरुणीने लग्न घटिका जवळ आली असताना आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. मीनल निवृत्ती भागवत ( वय – २३ ) असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे..

मीनल हिचे लग्न जुळले असून तिचा साखरपुडा झाला होता.. काही दिवसांतच लग्न तिचा विवाह होणार होता.. मात्र विवाहाची वेळ जवळ आली असताना मीनलने आत्महत्या का केली असावी? याचे कारण अद्याप समजू शकले नाही..

मीनलने राहत्या घरातील छताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे.. या घटनेची नोंद मीनलचे वडील किसन भागवत यांनी यावल पोलीस ठाण्यात केली आहे.. पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *