महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! नवरदेवाने वरमाला घालताच नवरीचा दुर्दैवी अंत…

प्रतिनिधी / लखनऊ

लग्नसमारंभ म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा क्षण असतो.. हा सोहळा निर्विघ्णपणे पार पडावा अशी सर्वांची इच्छा असते.. मात्र लखनऊच्या मलिहाबादमध्ये एका विवाह सोहळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे..

या विवाह सोहळ्यात सर्वकाही सुरळीत चालू होते.. इतर लग्न समारंभाप्रमाणे या ही लग्नात धावपळ, उत्साह होता.. मात्र अचानक एक घटना घडली आणि सर्वकाही बदलून गेले..

या लग्नाच्या विधीदरम्यान नवरीने नवऱ्या मुलाला हार घातला आणि नवऱ्यानेही नवरी मुलीला हार घातला.. मात्र ती अचानक स्टेजवर कोसळली आणि तिला अटॅक आला.. त्यानंतर काही वेळातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..

शिवांगी ( वय – २१ ) असे या मृत नवरीचे नाव आहे.. या घटनेने नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *