महत्वाच्या घडामोडी

नौदलाला मिळाले नवे बोधचिन्ह..नवे चिन्ह शिवाजी महाराजांना समर्पित…

प्रतिनिधी / कोची

देशातील सर्वात मोठे आणि पहिले स्वदेशी विमानवाहू ‘INS विक्रांत ‘ आज भारतीय नौदलाच्या सेवेत तैनात झाले आहे.. भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हाचेही यावेळी अनावरण करण्यात आले.. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे.. या चिन्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे..

नौदलाचे हे नवे चिन्ह भारताने वसाहतवादी भूतकाळ सोडला आहे हे सांगणारे आहे.. आत्तापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची खूण होती असे पंतप्रधान मोदी यांनी म्हणले आहे.. आतापर्यंत नौदलाचे प्रतिक पांढरा ध्वज होता.. ज्यावर उभे आणि आडवे लाल पट्टे होते, त्याच्या मध्यभागी अशोक चिन्ह बनवले होते.. तर डावीकडे वरती तिरंगा होता..

नौदलाच्या नवीन अनावरण झालेल्या चिन्हातून रेड क्रॉस काढून टाकण्यात आला आहे.. वरच्या डाव्या बाजूला तिरंगा आहे.. त्याच वेळी, निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात जहाजी नांगर दाखविण्यात आले असून त्यावर अशोक चिन्ह आहे.. हे सर्व एका अष्टकोनी ढालीत कोरण्यात आलं असून ही ढाल छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रमाणे दिसत आहे..

या अष्टकोनाच्या आठ बाजू भारतीय नौदलाच्या सर्व दिशेत पोहोचण्याची आणि कारवाई करण्याची क्षमता दाखवतात.. असे यावेळी सांगण्यात आले आहे.. या नवीन चिन्हाच्या खाली संस्कृत भाषेत ‘शं नो वरुणः ‘ लिहिले आहे.. याचा अर्थ ‘पावसाची देवता आमचे रक्षण करो.’

स्वराज्याला समुद्रावाटे होणाऱ्या परकीय हल्ल्यापासून वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सर्वात पहिली योजना आखून स्वतःचे नौदल उभारले होते.. असे म्हणत पंतप्रधान मोदिंनी शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *