महत्वाच्या घडामोडी

हात पाय आणि शरीराला दगड बांधून तरुणाला टाकले विहिरीत…

वाखारी शिवारातील याकुब शेख यांच्या विहिरीत भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथील लखन सुनील गांडुळे या २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.. त्यामुळे पंढरपूर परिसरात खळबळ माजली आहे.. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत..

याब्बत्चे सविस्तर वृत्त असे कि, भंडीशेगाव येथील लखन वय वर्षे २५ हा युवक मागील काही दिवसापासून ब्बेपत्ता होता..या संदर्भात त्याचा भाऊ शंभू सुनील गांडुळे याने पंढरपूर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.. दरम्यान सोमवार दिनांक २२ रोजी दुपारी एक वाजता वाखारी हद्दीतील याकुब शेख यांच्या शेतात लखन गांडुळे याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या आणि केसरी रंगाच्या नायलोन दोरीने दगड बांधलेल्या अवस्थेत तरंगताना दिसून आला..

याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस यांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला.. आणि त्याची ओळख पटवण्यात आली.. मयताचा भाऊ शंभू सुनील गांडुळे याने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे..

या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *