महत्वाच्या घडामोडी

प्रियकराने प्रेयसीला इतक्या निर्घुणपणे मारलं की…

प्रतिनिधी \ औरंगाबाद

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हडको परिसरात डी मार्ट जवळ एका महिलेचा खून झाला आहे. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सौरभ याने मुलगी अंकिता हिचा वादविवादातून खून केला आहे.

मयत मुलगी अंकिता ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी औरंगाबाद मध्ये आली होती. या काळात तिचे आणि सौरभचे एकमेकांवर प्रेम जडले. तीन दिवसांपूर्वी काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाल्यानंतर सौरभने तिचा खून केल्याचा संशय आहे.

अंकिताच्या खुनानंतर तिची रूम बंद होती. त्यामुळे तिसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना तिच्या रूममधून दुर्गंधी आल्याने त्यांनी रूममध्ये डोकावले. नागरिकांना तेथे रक्ताचा सडा पडलेला दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले. व ही घटना सर्वांसमोर आली. या घटनेमुळे संपूर्ण औरंगाबाद शहर हादरून गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *